Home Ahmednagar Live News चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

Crime News man was stabbed to death in an attempt to kill

अहमदनगर | Crime News: एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने ३ वर्ष सक्त मजुरी  व ५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी हा निकाल  दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल अनिल सरोदे यांनी काम पाहिले.

यश मनोज लोढा (रा. पटवर्धन चौक, नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

लोढा यानेमार्च २०१९ मध्ये  निखिल अशोक उपाध्ये यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. उपाध्ये यांच्या नवीपेठ येथील घरसंचार गृहउपयोगी वस्तू या दुकानातून घेतलेल्या वस्तूवरून लोढा व उपाध्ये यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी लोढा याने उपाध्ये यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात उपाध्ये यांच्या फिर्यादीवरून लोढाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: Crime News man was stabbed to death in an attempt to kill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here