Home अहमदनगर माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले

माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले

crime News married woman was burnt alive to bring two lakh rupees

कोपरगाव | Crime News: कुंभारी येथील विवाहितेस माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिला मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. तिला पेटवून दिले. यामध्ये ती गंभीर जखमी होऊन उपचार करीत असताना तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पती निखील मेहेत्रे व तिचा सासरा, सासू, दोन दीर, जाव अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पूजा मेहेत्रे असे मयत महिलेचे नाव आहे.

मयत विवाहितेने दोन नवीन घरे बांधण्यासाठी व संसारपयोगी वस्तू आणण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत यासाठी १६ फेब्रुवारी रोजी लग्न झाल्यापासून तिला सासरच्यांनी शारीरिक मानसिक त्रास दिला. २६ जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता मारहाण करून पेटवून दिले. विवाहितेला भाजलेल्या जखमी अवस्थेत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना बुधवारी तिचे निधन झाले.

याप्रकरणी मयत पूजा हिचे वडील पांडुरंग लोंढे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पती निखील मेहेत्रे, सासू लता मेहेत्रे, सासरा विलास मेहेत्रे, आशिष व स्वप्नील मेहेत्रे जाव रेखा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.  

Web Title: crime News married woman was burnt alive to bring two lakh rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here