Home Akole News Crime News: अकोले तालुक्यात घरातून दारूचा मोठा साठा जप्त

Crime News: अकोले तालुक्यात घरातून दारूचा मोठा साठा जप्त

Crime News stock of liquor seized from a house in Akole taluka

राजूर | Crime news: अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी घरातील दारू साठ्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. राजूर येथील संजय शुक्ला व रामदास कानकाटे यांनी अवैध रित्या दारू विक्रीकरीता घरात साठा करून ठेवल्याबाबत राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथकाने संजय शुक्ला याचे घरी छापा मारून त्याचे घरातून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

1) 17,040 रू किमतीच्या 284 देशी दारूच्या बाटल्या

2) 4160 रू किमतीच्या 26 मॅकडोनाल्ड व्हिस्की बाटल्या

एकूण – 21,200/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यानुसार राजूर पोलीस स्टेशन येथे गु. र. न.  182 /2021 मु. दा.का.65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तसेच रामदास कानकाटे याचे घरी छापा मारून त्याचे घरातून 1) 17220 रू किमतीच्या 288 देशी दारूच्या बाटल्या जप्त करून त्याचे राजूर पोलीस स्टेशन येथे गु. र. न.   181/2021 मु. दारूबंदी.का. क. 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. राहुल मदने, उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पो शि/ विजय फटागरे, पो शि/ अशोक काळे, चापोना/ पांडुरंग पटेकर, महिला होमगार्ड साबळे यांनी केली आहे.

Web Title:  Crime News stock of liquor seized from a house in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here