Home Ahmednagar Live News Crime News: प्रौढ व्यक्तीकडून लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य

Crime News: प्रौढ व्यक्तीकडून लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य

Crime News Unnatural acts from an adult to a child

अहमदनगर | Crime News: अहमदनगर शहरातील एका प्रौढ व्यक्तीने १३ वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणारी व्यक्ती ही लष्करी गणवेश परिधान केलेली होत असे फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना बुधवारी नगर शहराच्या सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रोडवर घडली.

१३ वर्षाचा हा अल्पवयीन पीडित मुलगा सायकलीवरून घराकडे चालला असताना लष्करी गणवेश परिधान केलेल्या आणि रस्त्याने चाललेल्या या अनोळखी व्यक्तीने त्याला थांबविले. मुलाला थांबविणारे ही व्यक्ती प्रौढ होती. “मै आर्मीवाला हू”, असेही सांगितले. येथील गॅरेजवर गाडी दुरुस्तीचे काम चालू असल्याचेही त्याने सांगितले.. येथे लघुशंका करू शकतो का, अशी विचारणा केली असता त्यावर हो म्हणाल्यावर लष्करी गणवेश परिधान केलेले त्या प्रौढ व्यक्तीने मुलाच्या हातातील सायकल हिसकावून घेत ती खाली पडली आणि मुलाला रस्त्याकडेला असलेल्या काटवनात घेऊन गेला. तिथे त्या व्यक्तीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर  १०० रुपये देत तेथून ही व्यक्ती पसार झाली, असे मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Crime News Unnatural acts from an adult to a child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here