Home Crime News संगमनेर खुर्द येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग

संगमनेर खुर्द येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग

Crime News young woman studying medicine at Sangamner Khurd was molested by a doctor

संगमनेर | Crime News: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून संगमनेर खुर्द येथील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातील एका डॉक्टरविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा संगमनेर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

पिडीत तरुणीला अश्लील टोमणे मारणे, मारहाण व शिवीगाळ करणे या आरोपावरून डॉक्टर निमेश सराफ रा.संगमनेर याच्याविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिडीत तरुणीकडून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पिडीत तरुणी सिद्धकला महाविद्यालयात शिकत होती. पिडीत तरुणी होस्टेल येथे राहत होती.  वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पिडीत तरुणीला डॉक्टर शिक्षक निमेश सराफ हा गेल्या सहा महिन्यापासून टोमणे मारणे, शिवीगाळ, घाणेरडे बोलून त्रास देत होता व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता. त्याच्या या वागण्याने तरुणीस मानसिक त्रास होत असल्याने पिडीत तरुणीने फिर्याद देताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सदर डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

Web Title: Crime News young woman studying medicine at Sangamner Khurd was molested by a doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here