Home अहमदनगर Crime News: गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या तरुणास अटक

Crime News: गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या तरुणास अटक

Crime news youth was arrested for walking around the village

अहमदनगर | Crime News:  नगर तालुका पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बागणार्‍या तरुणाला रूईछत्तीशी एसटी बस स्थानकाजवळ अटक केली.

राजू कुंडलीक खकाळ (रा. रूईछत्तीशी ता. नगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,  रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ एक तरूण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलीस पथकाला घटनास्थळी पाठविण्यात आल्याने पोलिसांनी खकाळ याला रूईछत्तीशी बसस्थानकावरून ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक असून त्याच्याकडून कट्टा, काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार खकाळ विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे.

Web Title: Crime news youth was arrested for walking around the village

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here