Home Ahmednagar Live News जिल्ह्यात या कारणांमुळे महिलांचा छळ, असे ओढतात जाळ्यात

जिल्ह्यात या कारणांमुळे महिलांचा छळ, असे ओढतात जाळ्यात

Cyber Crimes using social Media     

अहमदनगर: सोशियल मेडीयावर सक्रीय असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगाराकडून लक्ष केले जात आहे. अकौंट हॅकिंग, अश्लील चाट, फोटो वापरणे तर कधी मेसेज व व्हिडियो पाठवून Blackmail चे प्रकार वाढले आहे. गेल्या सहा महिन्यात येथे सायबर पोलीस ठाण्यात महिलांच्या संदर्भात तब्बल साडे चारशे तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे सोशियल मेडीयावरील महिलांचा वावर धोक्याचा ठरत आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसअपच्या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या ओळखीचे लोकही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेचे बनावट खाते बनवून अश्लील फोटो व मेसेज व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे.

असे ओढतात जाळ्यात:

फॉड करणारे इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तरुण मुलींशी प्रथम मैत्री करत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात त्यानंतर त्यांचे फोटो, व्हिडियो मिळवून त्यांना विविंध कारणासाठी blackmail करत असतात.

अशी घ्यावी काळजी:

तांत्रिक गोष्टीची माहिती असेल तरच इन्स्टाग्राम, फेसबुक व सोशियल मेडिया वापरावेत. आपली वैयक्तिक माहिती, व्हिडियो शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये. तसेच कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.  

Web Title: Cyber Crimes using social Media     

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दररोजच्या नवीन अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा: संगमनेर अकोले न्यूज- अहमदनगर लाईव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here