Breaking News | Nagpur: चौघे अंघोळीसाठी तलावात उतरले. यातील तिघांचा कुटुंबीयांसमोर बुडून मृत्यू झाला.
नागपूर: नागपूर शहरातील तीन कुटुंब डबा पार्टीसाठी मटकाझरी शिवारात आले. कुटुंबीय या शिवारातील तलावाच्या काठी असलेल्या पळसाच्या झाडाखाली सतरंजी टाकून विसावा घेत असताना चौघे अंघोळीसाठी तलावात उतरले. यातील तिघांचा कुटुंबीयांसमोर बुडून मृत्यू झाला, तर एक बचावला. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी वाजताच्या दरम्यान घडली.
जितेंद्र इस्ताराम शेंडे (३५, रा. गुलमोहरनगर, भरतवाडा, नागपूर), संतोष किशोर बावणे (२५) व निषेध राजू पोपट (१२, दोघेही रा. स्वामीनारायण मंदिर, श्रावणनगर, वाठोडा, नागपूर) अशी मृतांची नावे असून, मनीष दशरथ गडरिया, (श्रावणनगर, वाठोडा, नागपूर) हा थोडक्यात बचावला.
जितेंद्र शेंडे यांची सूरगाव (पाचगाव, ता. उमरेड) शिवारात शेती आहे. तिन्ही कुटुंबीय कारने डबे घेऊन शेतात आले होते. यात जितेंद्र, त्याची पत्नी ज्योत्स्ना, संतोष, त्याची मावशी मंगला राजेश पोपट, तिचा मुलगा निषेध व मुलगी देवांशी (८) आणि मनीषचा समावेश होता.
आधी अंघोळ करू
- आधी तलावात अंघोळ करू व नंतर जेवण करू, अशी सूचना जितेंद्र व संतोषने केली आणि दोघेही तलावात उतरले. त्यांच्या पाठोपाठ निषेध व मनीष अंघोळीसाठी तलावाच्या पाण्यात उतरले.
- क्षणात जितेंद्र व संतोष खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागले. मनीष त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावला तो निषेध बुडाला.
- मनीषने तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.
- गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास त्यांना तिन्ही मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. शोधकार्यात पोलिस उपनिरीक्षक देवीदास ठमके, हवालदार दिलीप लांजेवार यांच्यासह ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रात्री गवसले मृतदेह
कुही पोलिसांनी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पाचगाव ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांचाही तलावात शोध घ्यायला सुरुवात केली.
Web Title: Daba came for the party and lost his life
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study