अहमदनगर: दलित तरुणांना क्रूरपणे मारहाण प्रकरणी दोघांना अटक
Ahmednagar Crime: महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात हरेगाव येथे शेळी आणि कबूतर चोरीच्या आरोपावरून चार दलित पुरुषांना बेदम मारहाण करून उलटे लटकवण्यात आले.
श्रीरामपूर : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव गावात शेळी आणि काही कबुतरे चोरल्याच्या संशयावरून चार दलित पुरुषांना झाडाला उलटे टांगण्यात आले आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली, तर इतर पाच जण फरार आहेत. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ गावात मोर्चा देखील काढण्यात आला.
युवराज गलांडे, मनोज बोडके, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरग अशी आरोपींची नावे आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड व प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली होती. यातील दोघे जण हे अल्पवयीन व दलित समाजातील आहेत.
हरेगाव येथील युवराज नानासाहेब गलांडे यांच्या घरासमोरून एक वर्षापूर्वी शेळ्या व कबुतरे चोरी गेली होती. ती या चौघा तरुणांनी चोरल्याचा गलांडे यांना संशय होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातून पकडून अज्ञात ठिकाणी नेत झाडाला उलटे लटकवून जबर विवस्त्र करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यात जखमी पुरुषांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.
पीडित चौघा तरुणांवर आरोपींनी लज्जास्पद वर्तन केले. पीडितांवर लघुशंका केली गेली. आरोपींची गावामध्ये गेली अनेक वर्षे दहशत असून अनेक बेकायदा कृत्य यापूर्वी केले आहेत. आरोपी नानासाहेब गलांडे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. या मारहाणीच्या घटनेविरूद्ध आंबेडकरी समाजाने श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर रविवारी रास्तारोको आंदोलन केले.
Web Title: Dalit Youths Brutally Beaten Both were arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App