Home Crime News महाराष्ट्र हादरला, सैराटपेक्षाही खतरनाक! मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने दिली भयानक...

महाराष्ट्र हादरला, सैराटपेक्षाही खतरनाक! मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने दिली भयानक शिक्षा

Murder Case: प्रेमसंबधात मुलगी तीन दिवस घराबाहेर राहिली. समाजात अपमान झाल्याचा संशय व्यक्त करीत मुलीला झाडाला लटकवून गळफास दिल्याचे उघडकीस आले आहे.

Danger Murder father and cousin gave a terrible punishment after the girl ran away

जालना: ऑनर किंलीगवर आधारीत असलेल्या सैराट  चित्रपटापेक्षा भयानक घटना जालना येथे घडली आहे. मुलगी पळून गेल्यानं समाजात बदनामी झाल्याने बाप आणि चुलत्याने या मुलीला भयानक शिक्षा दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मयत तरुणीच्या पित्यासह तिच्या काकांना अटक केली आहे.

मृत तरुणीचे दूरचा नातेवाईक असलेल्या एका तरुणासह प्रेमसंबध होते. ही तरुणी घरात काहीही न सांगता नातेवाईक असलेल्या तरुणासह तीन दिवस घराबाहेर राहिली.  यामुळे समाजात अपमान झाल्याचा संताप व्यक्त करत मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला. ही हत्या नसून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे भासवण्यासाठी या दोघांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तिची हत्या केली. यानंतर  अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.  गावात चर्चा झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

मनाला हेलावणारी ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरणातील संशयीत आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडीलांसह काकांविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Danger Murder father and cousin gave a terrible punishment after the girl ran away

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here