Home क्राईम मुलीनेच फोडले आईच्या दुष्कर्माचे  बिंग, पोलीस प्रियकराच्या मदतीने…..

मुलीनेच फोडले आईच्या दुष्कर्माचे  बिंग, पोलीस प्रियकराच्या मदतीने…..

ऑनलाईन परीक्षेतील प्रकार, डमी उमेदवारांमार्फत परीक्षा देऊन वकील बनलेल्या महिलेसह तिचा पेपर देणाऱ्या वकील व मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

a daughter who broke the bed of the mother's

नवी मुंबई: कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्याद्वारे नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत राहणाऱ्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीने तिच्या आईविरोधात ही तक्रार केली आहे. आईचे मुंबईतील एका पोलीस निरीक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याने ती मुलगी वडिलांसोबत राहायला आहे.

दरम्यान २०२० मध्ये तिच्या आईने लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत स्वतःची परीक्षा देण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या मदतीने उलवे येथील एका वकिलाचा वापर केला होता.

काही पेपर उलवे येथे तर काही पेपर नेरुळमध्ये बसून मोबाईलवर देण्यात आले होते. यासाठी संबंधित वकिलाने मोबाईलचा कॅमेरा बंद करून स्वतः पेपर सोडवून तक्रारदार यांच्या आईला उत्तम गुणांनी पास होण्यास मदत केली होती. मात्र हा प्रकार तक्रारदार यांना खटकत राहिल्याने अखेर त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पोलीस प्रियकराच्या मदतीने…..

डमी उमेदवारांमार्फत परीक्षा देऊन वकील बनलेल्या महिलेसह तिचा पेपर देणाऱ्या वकील व मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनदा परीक्षा देऊनही उत्तीर्ण न होऊ शकलेल्या महिलेने, अखेर पोलीस प्रियकराच्या मदतीने एलएलबी पास होण्यासाठी ही शक्कल लढवल्याचे मुलीच्या तक्रारीवरून समोर आले आहे.

Web Title: a daughter who broke the bed of the mother’s

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here