भरदिवसा गोळीबार, कुख्यात गुंडाची हत्या, पाच जखमी
Mumbai Firing: चुनाभट्टीत दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना, पॅरोलवर बाहेर आला होता गुंड येरुणकर.
मुंबई : महिनाभरापूर्वी पॅरोलवर बाहेर आलेला गुंड सुमित उर्फ पप्पू येरुणकर (४६) याची चुनाभट्टीत दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. येरुणकर पासून वेगळ्या झालेल्या सनी पाटील आणि सागर यांनी बांधकामाच्या कंत्राटासाठी त्याची हत्या केल्याचे समजते. या हल्ल्यात आठ वर्षांच्या एका मुलीसह पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कंत्राट सागर सावंत, सनी पाटील यांना दिल्यामुळे सुमितने आर्यन बिल्डरवर गोळीबार केला होता. याप्रकरणातून महिनाभरापूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला. रविवारी हेच कंत्राट मिळवण्यासाठी सुमित विकासकाच्या कार्यालयात गेला. ते समजताच कार्यालयाबाहेरच दबा धरून बसलेल्या नरेश नावाच्या व्यक्तीने सुमितवर अंदाधुंद गोळीबार करत पळ काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली.
चुनाभट्टी येथील गजबजलेल्या आझाद गल्ली परिसरात दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी १६ गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबारात पोटाला आणि खांद्याला दोन गोळ्या लागून येरुणकर गंभीर जखमी झाला. रोशन लोखंडे (३०) याच्या उजव्या मांडीला, मदन पाटील (५४) यांच्या डाव्या काखेत, आकाश खंडागळे (३१) याच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि आठ वर्षांच्या त्रिशा शर्मा हिच्या उजव्या हाताला गोळी लागली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या येरुणकर याचा मृत्यू झाला असून अन्य चार जणांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
तपासासाठी ९ पथके
याप्रकरणी चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपासासाठी नऊ पथके स्थापन करण्यात आली आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी केंद झाले असून त्या आधारे पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले.
Web Title: Daylight firing, killing of notorious gangster, five injured
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App