अकोले ब्रेकिंग! कपड्याने बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह
Breaking News | Akole: पती पत्नी जोडप्याचे एकमेकांना घट्ट मिठी मारून कमरेला कापडाने बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ.
अकोलेः अकोले तालुक्यातील खिरविरे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या पती पत्नी जोडप्याचे एकमेकांना घट्ट मिठी मारून कमरेला कापडाने बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना तालुक्यातील खिरविरे येथील आंबेविहीरवाडी शिवारात गुरुवार सायंकाळी समोर आली. नेमकी आत्महत्या की घातपात? याबाबत पोलीस तपास करीत आहे.
बहिरू काळू डगळे (वय २५) व सारिका बहिरू डगळे (वय २२) असे मयत विवाहित दोघांची नावे आहेत. या जोडप्याचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. दि. १ जुलै रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल होती. तीन दिवसांनी डगळे यांच्या घराजवळपासच्या विहिरीत दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. रात्री उशिरा अकोले ग्रामीण रुग्णालयात या दोघांचे मृतदेह आणले. आत्महत्या की घातपात? या बाबत पोलिस तपास करत आहेत.
Web Title: dead bodies of the husband and wife were found wrapped in cloth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study