Home अहमदनगर शेततळ्यावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले असता धक्कादायक प्रकार आला समोर

शेततळ्यावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले असता धक्कादायक प्रकार आला समोर

Ahmednagar News:  एका शेततळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  आढळून आल्याची घटना.

The dead body of a stranger was found in a farm

कोपरगाव : तालुक्यातील टाकळी शिवारात एका शेततळ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात द्वारकानाथ जगन्नाथ देवकर यांचे शेत आहे. शेतातील शेततळ्यावर असलेली विद्युत मोटार सुरू करण्यासाठी मंगळवारी सकाळी विशाल देवकर हे तिथे गेले. तेव्हा त्यांना शेततळ्यात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी पोलिसपाटील व शहर पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. मृत व्यक्तीची ओळख सायंकाळपर्यंत पटलेली नव्हती. आता पोलीस ओळख पटविण्याचे तसेच हा प्रकार खून की आत्महत्या याबाबत अधिक चौकशी करीत आहे.

Web Title: The dead body of a stranger was found on a farm

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here