धक्कादायक! आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा गादीखाली मृतदेह आढळल्याने खळबळ
एका आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह (Dead Body) गादी खाली संशयास्पद आढळून आल्याची धक्कादायक घटना.
वर्धा: वर्ध्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह गादी खाली संशयास्पद आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ध्यातील आश्रमशाळेत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमशाळेतील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा गादीखाली मृतदेह आढळून आला. वर्धा जिल्ह्यातील यादवरावजी केचे आश्रमशाळेतील ही घटना आहे.
कारंजा घाडगे तालुक्यातील नारा या भागातील ही घटना आहे. या भागातील यादवरावजी केचे आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवम समोज उईके असं १२ वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटच्या चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील विद्यार्थी होता.
यादवरावजी केचे आश्रमशाळेत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू आढळला आहे. शिवम हा आश्रमशाळेत आज बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता दिसला होता. याच शिवमचा मृतदेह रात्री साडे आठ वाजता विद्यार्थी झोपण्याकरिता गादी काढताना गादीखाली आढळला. शिवमचा मृतदेह आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: dead body of a student in an ashram school was found under the mattress
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App