प्रवरा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
Ahmednagar News: प्रवरा नदीपात्रात सोमवारी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
कोल्हार: कोल्हार-भगवतीपूर परिसरात प्रवरा नदीपात्रात सोमवारी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीचे साधारणपणे वय ६० ते ६५ असून त्याचा मृतदेह पाण्यात वाहून तरंगताना आढळून आला. यामागे घातपात आहे की काय, याचा तपास लोणी पोलीस करीत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हारच्या भगवतीपूर हद्दीत वसंत नानासाहेब खर्डे यांच्या शेतीलगत असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याजवळ हा मृतदेह आढळून आला.
भगवतीपूरचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस नाईक दिनकर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. पुरुष जातीच्या मयत व्यक्तीचे वय ६०च्या आसपास आहे. त्याच्या अंगावर पांढरे कपडे व शर्टवर पिवळ्या कलरची डिझाईन आहे. मयत व्यक्तीबाबत कुणास काही माहिती असल्यास अथवा कुठे कुणी असा व्यक्ती बेपत्ता असल्यास लोणी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले आहे.
Web Title: The dead body of an unknown person was found in the Pravara riverbed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App