Home महाराष्ट्र खळबळजनक! अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला तरुणीचा व बिबट्याचा मृतदेह

खळबळजनक! अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला तरुणीचा व बिबट्याचा मृतदेह

Breaking News | Satara: एका झाडावर बिबट्याचा तर झाडाखाली मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

dead body of girl and leopard found on ajinkyatara fort

सातारा: सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजापासून काही अंतरावर एका झाडावर बिबट्याचा तर झाडाखाली मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलगी ही सातारा तालुक्यातील आहे. प्राथमिक तपासात या तरुणीने आत्महत्या केली असून, ती एक महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतीक्षा दीपक कदम (वय १७, रा. नागठाणे, ता. सातारा) असे मृत मुलीचे नाव आहे. तर मृत बिबट्याचे पिल्लू हे ७ ते ८ महिन्यांचे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किल्ल्यावर एका झाडावर मृतावस्थेत बिबट्या आणि खाली मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर बिबट्यामुळे वन विभागाच्या पथकलाही पाचारण करण्यात आले होते. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह झाडावरून खाली घेतल्यानंतर बिबट्याचे पिल्लू असल्याचे आढळले असून हे पिल्लू ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे तपासात आढळले. बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

तर मृत मुलगी ही नागठाणे परिसरातील असून ती १७ वर्षांची आहे. ती गेल्या २० वीस दिवसांपूर्वी बेपत्ता होती. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजाच्या बाजूकडून उग्र वास येत असल्याचे काही नागरिक किल्ल्यावर गेले. या ठिकाणी त्यांना एका झाडाखाली तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला. तर झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळला.

एकाच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल शिरोळे, सुजित भोसले, इरफान पठाण, पंकज मोहिते आदी घटनास्थळी गेले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बिबट्याचा झाडाच्या दोन्ही फांद्यांमध्ये अडकून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच दोघांच्याही मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: dead body of girl and leopard found on ajinkyatara fort

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here