अहमदनगर: हॉटेलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह
Breaking News | Ahmednagar: सिंग रेसिडेन्सी हॉटेलच्या रूममध्ये तरुण मृत अवस्थेत आढळून आला.
अहमदनगर: तारकपूर परिसरातील सिंग रेसिडेन्सी हॉटेलच्या रूममध्ये तरुण मृत अवस्थेत आढळून आला. प्रकाश जयकिसन जाकोटिया (वय ३७ रा. रेणुकानगर, आंबेजोगाई रस्ता, जि. लातुर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल असे पोलिसांनी सांगितले. प्रकाश जकोटिया हॉटेलच्या रूममध्ये बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती मॅनेजर थॉमस अरुण फर्नांडिस (वय ३६ रा. विजयनगर चौक, भिंगार) यांनी बुधवारी (दि. २९) रात्री तोफखाना पोलिसांना दिली. पोलीस अंमलदार आर. ए. बारगजे यांनी हॉटेलमध्ये जाऊन खासगी रुग्णवाहिकेतून जकोटिया यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जकोटिया हे नगरमध्ये कशासाठी आले होते. त्यांचा हॉटेलमध्ये मृत्यू कोणत्या कारणातून झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील आंधळे करत आहेत.
Web Title: Dead body of the young man was found in the hotel
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study