Home क्राईम लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह,  महिलेची हत्या झाल्याचा संशय

लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह,  महिलेची हत्या झाल्याचा संशय

Kalyan Crime:  लॉजमधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला, या महिलेची हत्या झाल्याचा संशय.

Dead Body of woman found in lodge, suspected to be murdered

कल्याण : स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असे मृत महिलेचे नाव आहे. ती एका इसमासोबत काल दुपारच्या सुमारास लॉजमध्ये आली होती, आज सकाळी तिचा मृतदेह आढळून आला आहे. तिच्यासोबत असलेला इसम भूपेंद्र गिरी हा फरार झाला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मधील एका रूम मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती. ज्योती तोरडमल ही भूपेंद्र गिरी नावाच्या एका इसमासोबत काल दुपारच्या सुमारास स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजवर आली होती . आज सकाळी बराच वेळ झाला मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉज मधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ज्योतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलाय. ज्योतीसोबत आलेला भूपेंद्र गिरी हा पसार झालाय. ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फरार झालेल्या भूपेंद्र गिरी याच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना झालेत. भूपेंद्र ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

शनिवारी साडेतीनच्या सुमारास मयत ज्योती तोरडमल आणि भुपेंद्र गिरी यांनी तृप्ती लॉजचा रूम भाड्याने  घेतली.  काहितासात भुपेंद्र जेवण पार्सल आणण्यासाठी खाली जात असल्याचे लॉज मॅनेजरला सांगून गेला. सकाळी नेहमीप्रमाणे लॉजचा  वेटर रुम सर्व्हिससाठी त्याने दरवाजा वाजवला बराचवेळ दरवाजा वाजवला, पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे वेटरने दरवाजाच्या लॅचला हात लावताच दरवाजा उघडा आसल्याने वेटर रूम मध्ये शिरला मॅडम “आपका टाइम खतम हुआ है, उठीये ” महिलेचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या वेटरने घडलेला प्रकार मॅनेजरला सांगितला. मॅनेजरने खात्री केली आणि कल्याण महात्मा फुले चौक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील,पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी आपल्या टीमसह घटनेची पाहणी केली.  पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिलेच्या नाकातून रक्त श्राव होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी महिलेच्या तोंडावर उशी ठेऊन तिचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Dead Body of woman found in lodge, suspected to be murdered

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here