Home नागपूर धक्कादायक! हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह

धक्कादायक! हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह

Breaking News | Nagpur Dead Body: एका हॉटेलच्या खोलित युवक मृतावस्थेत मिळून आला.

Dead body was found in the hotel room

नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याअंतर्गत एका हॉटेलच्या खोलित युवक मृतावस्थेत मिळून आला. स्वप्नील खेळकर (35) रा. वाडी असे मयताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना म्हाळगीनगरातील हॉटेल आर्या येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्नील हा सोमवारी दुपारच्या सुमारास म्हाळगीनगरातील आर्या हॉटेलमध्ये आला. त्याने एक खोली बुक केली. ठरल्यानुसार तो मंगळवार 18 जून रोजी दुपारी 3 वाजता खोली सोडणार होता. मात्र, बराच वेळ होवूनही तो बाहेर निघाला नाही. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचारी स्वप्नीलच्या खोलीवर गेला. मात्र, रुम आतमधून बंद होते. आवाज दिला. दार ठोठावला. मात्र, आतून कुठलाच प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही प्रयत्न केले.

अखेर कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत दार तोडून आतमध्ये गेले असता सर्वाना धक्का बसला. स्वप्नील हा बेडवर मृतावस्थेत पडून होता. त्याचे शरीर हिरवे पडले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रवाना केला. त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचे सुसाईट नोट (Suicide Note) मिळाले नाही. त्याच्या मृत्युचे कारणही पोलिसांना कळू शकले नाही. पोलिसांनी त्याच्या जवळून मिळालेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटविली तसेच नातेवाईकांना माहिती दिली.

Web Title: Dead body was found in the hotel room

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here