Home संगमनेर संगमनेर: प्रवरा उजव्या उजव्या कालव्याच्या चारीत मृतदेह आढळला

संगमनेर: प्रवरा उजव्या उजव्या कालव्याच्या चारीत मृतदेह आढळला

Breaking News | Sangamner: प्रवरा उजव्या कालव्यातील चारीत सायकलसह एक मृतदेह पडलेला आढळून आला.

dead body was found near the right canal of Pravara

संगमनेर: तालुक्यातील चणेगाव शिवारात शनिवारी (दि.28) सकाळी प्रवरा उजव्या कालव्यातील चारीत सायकलसह एक मृतदेह पडलेला आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की चणेगाव शिवारातून प्रवरा उजवा कालवा जातो. याठिकाणी असलेल्या चारीत शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती सायकलसह पालथा पडलेला दिसला. त्यामुळे ही बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली असता बाबासाहेब सोनवणे यांनी तत्काळ आश्वी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केल्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेली व्यक्ती ही राहुरी तालुक्यातील निभेंरे येथील रहिवासी असून नाव रमेश बन्सी सोनवणे (वय 52) असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान मयत रमेश सोनवणे यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने मोलमजुरी करून ते कुटुबांचा उदरनिर्वाह चालवत होते.

Web Title: dead body was found near the right canal of Pravara

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here