ट्रॅक्टरच्या चाकाखाली विद्यार्थिनीचा मृत्यू- Accident
Washim Accident: रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
वाशीम: सायकलवरून शाळेत जाताना रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कामरगावातील काझी प्लॉट येथे घडली आहे.
अतेमा फातेमा मुजाईद खान असे या अपघातात मृत्यू झालेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सायकलवरून शाळेत जात असताना समोरून रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला मागील बाजूची विद्यार्थिनी दिसली नसल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले. सध्या गावात तणाव पूर्ण शांतता असून अधिक कारवाई कामरगाव पोलीस करत आहेत.
Web Title: Death of a student under the wheel of a tractor Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App