अहमदनगर: पाटचारीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: पाटचारीतील पाण्यात पडून अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना.
नेवासा: पाटचारीतील पाण्यात पडून अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वाकडी (ता. नेवासा) येथे गुरूवारी रात्री घडली.
सर्वज्ञ भगवान गायकवाड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. भगवान बाबासाहेब गायकवाड यांचा तो मुलगा होता. वाकडी फाटा येथे वस्तीवर गायकवाड कुटुंब राहण्यास आहे. घराजवळूनच पाटचारी गेली आहे. पाटाला पाणी आलेले आहे. कुटुंब घरकामात व्यस्त असताना सर्वज्ञ हा खेळत खेळत पाटचारीकडे गेला. तो पाटाच्या पाण्यात पडला.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
बराचवेळेनंतर घरात तो नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली. घरापासून एक किलोमीटर अंतरावर पाटचारीतील झुडूपात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Death of a toddler after drowning in Patchari
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study