अहिल्यानगर: पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, पोहण्याचा मोह बेतला जीवावर!
Breaking News | Ahilyanagar: मुळानदीच्या पुलावरून पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
राहुरी: राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात आज दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान मुळानदीच्या पुलावरून पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
बाळू रामनाथ जाधव (वय ३५ वर्षे) हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून कामाला होता. तो त्याच्या कुंटूबासह राहत होता.
आज दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान बाळू जाधव हा तरुणाने पोहण्यासाठी तांदुळवाडी शिवारातील मुळानदीवरील पुलावरुन नदीपात्रात उडी मारली. थोडावेळ त्याने पोहण्याचा आनंद लूटला. मात्र त्याचा दम तूटल्याने तो पाण्यात बुडू लागला.
त्यावेळी त्याच्या बरोबर असलेला त्याचा मेव्हणा व भावजयने त्याला वाचवीण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाण्यात बुडाला आणि दिसेनासा झाला. काही तरुणांनी बाळू जाधव याचा पाण्यात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, पोलिस नाईक गोवर्धन कदम, अंकुश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या बाळू जाधव या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु होते.
Web Title: Death of a young man who went swimming
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study