अहमदनगर: शेततळ्यात बुडून सासरे सुनेचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: शेततळ्यातून पाणी काढत असताना विवाहितेचा आणि तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना.
पारनेर : शेततळ्यातून पाणी काढत असताना विवाहितेचा आणि तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. यावेळी तिला वाचविण्यासाठी तिच्या सासऱ्याने शेततळ्यात उडी मारली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचाही मृत्यू झाला.
मुरलीधर मारुती नवले (वय वर्ष ७०) व उज्ज्वला आबा नवले (वय वर्ष ४०) असे दोघा मयतांची नावे आहेत. या घटनेची माहिती तत्काळ पारनेर पोलिसांना कळविण्यात आली. ग्रामस्थांनी मुरलीधर नवले व उज्ज्वला नवले यांना शेततळ्याबाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: Death of daughter-in-law by drowning in the farm
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study