Home औरंगाबाद संतापजनक! पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराचा अत्याचार

संतापजनक! पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराचा अत्याचार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

death of her husband, the woman was abused by her cousin on the thirteenth day

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  पैठण तालुक्यातील एका गावात शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी नराधम चुलत दिरावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दीर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे तेरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. शनिवारी तेराव्याचा कार्यक्रम असल्याने सकाळचा विधी पार पाडण्यात आला. मात्र दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडित महिला ही शेजारीच असलेल्या चुलत सासूच्या घरी गेली. यावेळी चुलत दीर हा एकटाच घरी होता. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून पीडितेवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितले तर, जीवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या निधनानंतर कोसळलेल्या या आघाताने महिला भेदरुन गेली होती. तसेच प्रचंड घाबरुन गेल्याने तिने याबाबत कुणालाही काहीही सांगितलं नाही. पण त्यानंतर पीडित महिलेने रविवारी पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या पतीचं निधन झाल्याने, तेराव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असताना त्याच दिवशी तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

गुन्हा दाखल होताच आरोपी दीर फरार झाला आहे. मात्र पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून, एक पथक यासाठी कार्यरत करण्यात आल्याची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.

Web Title: death of her husband, the woman was abused by her cousin on the thirteenth day

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here