संगमनेर: वडिलांच्या दशक्रिया विधीतच पिंडासमोर मुलाचा मृत्यू
Sangamner news: दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असताना, काकस्पर्श होण्याआधीच मोठ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
संगमनेर: वडिलांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असताना, काकस्पर्श होण्याआधीच त्यांचा मोठ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंप्री- लौकी अजमपूर येथे घडली. वडिलांपाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण कारभारी दराडे यांचे १० दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने उपचाराच्या दरम्यान निधन झाले होते. गुरुवारी (दि. २१) त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असताना, काकस्पर्श होण्याआधीच त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय ४०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
लक्ष्मण कारभारी दराडे यांचा गुरुवारी दशक्रिया विधी सुरू होता. त्यासाठी ग्रामस्थांसह नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता. याच वेळी पिंडाला कावळा शिवण्याचा विधी सुरू असताना, हात जोडून उभे असलेले दिलीप दराडे अचानक खाली कोसळले. ग्रामस्थ व नातेवाईक यांनी वेळ न दवडता, दराडे यांना आश्वी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु दराडे यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी दराडे यांना मृत घोषित केले.
या घटनेने आश्वीसह परिसरात पसरल्याने सर्वत्र शोककळा पसरली. दुपारी शोकाकुल वातावरणात दिलीप दराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: death of the son in front of Pinda in the Dasakriya ritual of the father
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App