अहमदनगर: महिलेस बेशुध्द करून चार तोळे सोन्याचे दागिने लांबविले
Ahmednagar News | Pathardi: एका महीलेचे चार तोळे सोन्याचे पर्समधे ठेवलेले सोने शेजारी बसलेल्या महीलेने लुटले. (Theft)
पाथर्डी : महिलांनो एसटीचा प्रवास करताना सावधान रहा. एसटीमध्ये महिलांचे दागीने लुटण्याचे अनेक घटना वाढल्या आहेत. पुणे येथील एका महीलेचे चार तोळे सोन्याचे पर्समधे ठेवलेले सोने शेजारी बसलेल्या महीलेने लुटले आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी ही घटना विठोबाराजे मंगलकार्यालय ते तिसगाव दरम्यान एसटी प्रवास करताना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी २५ डिसेंबर २०२३ रोजी, दुपारी ३.२० वाजता पाथर्डी- पुणे एस.टी. एमएच १४ बीटी ३१५५ ही बस सुटली. पाथर्डीच्या स्टॅन्डवरून एक थोडीसी जाडसर स्त्री, लाल साडी घातलेली, तोंडाला पांढरा स्कार्प घातलेला. स्वतः शेजारी एक सीट खाली ठेवते. विठोबाराजे मंगल कार्यालयाच्या स्टॉपवरून बसमध्ये चढलेल्या, जवळ चार तोळे वजनाचे गंठण पर्समध्ये ठेवलेल्या स्त्रीला हाताने धरून
शेजारी बसवते. अर्थात दिवसभर पाळत ठेवलेली असावी. काही साथीदारांच्या मदतीने सर्वकाही नियोजन झालेले असावे. लाल साडी व स्कार्प बांधलेल्या स्त्री ने काय आणि कसले औषध वापरले कळाले नाही. शेजारी बसवलेल्या स्त्रीला तिने गुंगवले व पर्स मधील चार तोळ्याच्या आसपास असलेल्या सोन्याचे गंठण अलगद काढून घेवून अवघ्या १० मिनीटात तीसगाव मध्ये उतरून निघून गेली. सदर अज्ञात महिलेवर आज पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: Theft- decontaminating the woman, four tola gold ornaments were removed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App