Home संगमनेर Deer Death: संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू

Deer Death: संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू

Deer Death in collision with unknown vehicle in Sangamner 

Sangamner | संगमनेर: कडक उन्हाळा सुरु असल्याने वन्य प्राण्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. चारा पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचे हाल होत आहे. संगमनेर  तालुक्यातील वडझरी बुद्रुक शिवारात अज्ञात वाहनाच्या जोराच्या धडकेने हरिण (Deer Death) जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे डांबरी रस्त्यावर घडली.

लोणी ते नांदूरशिंगोटे डांबरी रस्त्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने हरिणाला जोराची धडक दिली. हरिणाच्या तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

युवक कार्यकर्ते शशिकांत जगताप व गणेश बोडखे यांनी याबाबत तळेगाव दिघे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फड व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर डॉ. फड यांनी घटनास्थळी येवून पाहणी कली.

वनपाल प्रशांत पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी मृत हरिणाला अंत्यसंस्कारासाठी निंबाळे रोपवाटिकेत हलविले. हरिणाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Deer Death in collision with unknown vehicle in Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here