आमदार जगताप यांची बदनामी; व्हिडिओ केला प्रसारित, तिघांवर गुन्हा
Breaking News | Ahmednagar: वकिल दाम्पत्याच्या खुनाशी संबंध असल्याचा व्हिडिओ केला प्रसारित.
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील आढाव वकिल दाम्पत्यांच्या खून प्रकरणात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा संबंध असल्याची माहिती युट्यूब चॅनलद्वारे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. याप्रकरणी निखिल वागळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), सुनील सातपुते (रा. केडगाव) व केडगाव शिवसेना फेसबुक अकाऊंटधारक व्यक्तीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य सुधाकर बोरकर (रा. सावेडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आढाव वकिल दाम्पत्यांच्या खून प्रकरणी व्हिडीओ प्रसारित करत आमदार जगताप यांचे या प्रकरणात नाव घेत त्यांची बदनामी केली. याप्रकरणी नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने निषेध करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार जगताप यांचा राहुरी येथील वकिल दापत्याच्या खून प्रकरणी संबंध असल्याबाबत चुकीची माहिती निखिल वागळे यांनी युट्युब चॅनलद्वारे सोशल मीडियावर प्रसारित करून आमदार जगताप यांची बदनामी केली. तसेच सदरचा व्हिडीओ केडगाव शिवसेना या फेसबुक अकाऊंटवर प्रसारित करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक मुजावर करीत आहेत.
Web Title: Defamation of MLA Jagtap
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study