तरुणीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून बदनामी, माजी प्रियकराला अटक
Breaking News | Mumbai Crime: तरुणीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी जावेद नावाच्या माजी प्रियकराला अखेर दिंडोशी पोलिसांनी अटक.
मुंबई : लग्नास नकार दिल्याने एका तरुणीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी जावेद नावाच्या माजी प्रियकराला अखेर दिंडोशी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी आणि जावेद हे दोघेही एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात चांगली मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. याच दरम्यान जावेदने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याच्या मोबाइलवर काढले होते. याबाबत तिला काहीच माहिती नव्हती. तिच्या संमतीविना त्याने ते फोटो आणि व्हिडीओ काढले होते. काही दिवसांनंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन खटके उडू लागले होते. त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडून टाकले. तसेच त्याचे कॉल घेणे, मेसेजला रिप्लाय देणे बंद केले होते. याच दरम्यान तिचे एका तरुणासोबत लग्न ठरले. ही माहिती समजताच जावेदने तिला ब्लॅकमेल करत धमकी देण्यास सुरुवात केली.
आपल्याशी लग्न केले नाहीतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी करण्याची तो तिला सतत धमकी देत होता. मात्र त्याच्या धमकीकडे तिने दुर्लक्ष केले. त्याचा त्याला प्रचंड राग आला. याच रागातून त्याने तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ तिच्या भावी पतीला पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार तिला समजताच तिने दिंडोशी पोलिसांत जावेदविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी त्याला शुभम हॉटेल परिसरातून जावेदला अटक केली.
Web Title: Defamation of young girl by viral video with obscene photos
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study