अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या आधी ह्या तालुक्याचे विभाजन करण्याची मागणी
Akole News : अकोले तालुक्यात राजूर हा तालुका करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Rajur Taluka Demand).
अकोले: अकोले तालुका हा भौगोलिक दृष्टीने मोठा आहे. अदिवासी भागातील खेड्या- पाड्यातील अपुरी दळणवळण व्यवस्था अपुरी असल्याने अदिवासी बांधवांना जाणे-येणे गैरसोयीचे होते.
पूर्ण दिवस खर्च होतो. कुठे तरी बसस्थानक व इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते. वेळेत काम होत नाही. त्यामुळे अकोले तालुक्याचे विभाजन करून हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेऊन राजूर तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी केली आहे.
राजूर तालुक्याची निर्मिती झाल्यास आदिवासी समाज बांधवाचा विकास होऊन शासकीय, योजना राबविण्यात प्रशासकीय सोयीचे होईल. शासनाने दखल घेऊन राजूर तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आता नव्यानेच होत आहे.
प्रसिद्धी पत्रकात आदिवासी बांधवांनी म्हटले, की अदिवासी भागातील राजुर ही मध्यवर्ती बाजारपेठ आहे. या ठिकाणी अदिवासी प्रकल्प कार्यालय, शैक्षणिक सुविधा, न्यायालय, आरोग्य सुविधा, प्रशासकीय सुविधा उपलब्ध आहेत.
त्यामुळे राजुर तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी अनंत महादु घाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, अदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, सुरेश गभाले, दत्ता ढगे, नरहरी इदे, भिमा अवसरकर, दौलत देशमुख, पाडूरग पदमेरे, अशोक भोजणे, सुनील मधे, दिनकर कडाळी, गोपाळा कडाळी, हनुमंत बुळे, तुकाराम सारूक्ते आदींनी सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने केली आहे.
Web Title: Demand for division of this taluka before Ahmednagar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App