कृषी पर्यवेक्षकास मागितली खंडणी, १ लाख द्या.. आमच्याकडे पुरावे
Ahmednagar News: माहिती अधिकारातून महाडीबीटीच्या योजनांची माहिती मिळविली. त्यात तफावत आढळल्याचे म्हणत कृषी पर्यवेक्षकास पैसे मागणाऱ्या दोघांविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात खंडणीसह शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा.
कर्जत : माहिती अधिकारातून महाडीबीटीच्या योजनांची माहिती मिळविली. त्यात तफावत आढळल्याचे म्हणत कृषी पर्यवेक्षकास पैसे मागणाऱ्या दोघांविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात खंडणीसह शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक फरार आहे.
कृषी पर्यवेक्षक नवनाथ जत्ती यांच्या फिर्यादीवरून गणेश तुळशीराम तोरडमल आणि दादा शिर्के (दोघेही रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत) या दोघांवर गुन्हा दाखल झाला. गणेश तोरडमल याने कर्जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकार अर्जाद्वारे महाडिबीटी अंतर्गत बहिरोबावाडी, सुपे, रेहकुरी, वालवड, चिंचोली काळदात या गावांमध्ये ठिबक सिंचन योजनेप्रमाणे किती लाभाथ्यर्थ्यांना लाभ मिळाला याबाबतची माहिती मागितली होती. त्यास माहिती देण्यात आली. त्यानंतर तोरडमल याने कृषी पर्यवेक्षक नवनाथ जत्ती यांना फोन केला. मिळालेल्या माहितीमध्ये बराच काळाबाजार दिसून येत आहे. तुमची आता तक्रार करणार आहे. तुम्हाला जर सुटका हवी असेल तर तडजोड करा, असे तो जत्ती यांना धमकावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दादा शिर्के हादेखील जत्ती यांना वारंवार फोन करून गणेश तोरडमलचा काय विषय आहे, तो मिटवून टाका. नाही तर तुम्हाला आमच्याकडून त्रास होईल, असे म्हणत असे. ठिबक सिंचन वाटपात अनियमितता आहे. त्याचे आमच्याकडे सर्व पुरावे असून, आम्हाला १ लाख १५ हजार रुपये द्या, अशी ते दोघे मागणी करायचे, अखेर त्यांना ५० हजार रुपये दिल्याचेही जत्ती यांनी म्हटले आहे.
Web Title: Demanded extortion to agricultural supervisor, pay 1 lakh
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App