Home अकोला पगार वाढवतो असं सांगत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, दोन अभियंत्यांवर विनयभंगाचा गुन्हा

पगार वाढवतो असं सांगत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, दोन अभियंत्यांवर विनयभंगाचा गुन्हा

Breaking News | Akola Crime: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे (molestation) गुन्हे दाखल.

Demanding physical comfort from a young woman saying that she will increase her salary

अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडे  शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शाखा अभियंता आर इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे. पीडीत महिलेला पगार काढणे आणि पगारात वाढ करण्यासाठी या दोघांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केरण्यात आला आहे. याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अकोला जिल्ह्यातून हा संतापजनक प्रकार समोर आला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात चक्क दोन अधिकाऱ्यांनी 29 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप पीडीत तरुणीने केला.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुर्तिजापूर पोलिसांत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार मुर्तिजापूरातील जीवन प्राधिकरण कार्यलयात घडला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात 29 वर्षीय तरुणी कंत्राटी कंम्प्युटर आपरेटर म्हणून कार्यरत आहे. मागील महिन्यांपासून तिचा पगार थकीत आहे. त्यात पगरात वाढ व्हावी, म्हणून पीडित तरुणीनं कार्यलयातील शाखा अभियंता डी.बी. कपिले यांच्याकडे पगार वाढीसाठी विनवणी केल्या. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अधिकारी देत नव्हते.

अखेर दुय्यम अधिकारी आर इंगळे यांना ती भेटली असता आपण SDO नाहीये काही करू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. पगार काढण्यासाठी त्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच 20 जून रोजी कपिले याने चेंबरमध्ये तरुणीला बोलवले असता तरुणी एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीने त्याला विरोध केला असता कामावरून काढून टाकण्याची धमकी अधिकारी देऊ लागला. अखेर तरुणीनं घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तरुणीने पोलीस ठाणे गाठत तरुणीच्या तक्रारीवरून शाखा अभियंता डी.बी. कपिले आणि आर. इंगळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अरुण मेश्राम अधिक तपास करत आहेत.

Web Title: Demanding physical comfort from a young woman saying that she will increase her salary

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here