Home संगमनेर संगमनेरातील 30 जणांवर हद्दपारीची कारवाई

संगमनेरातील 30 जणांवर हद्दपारीची कारवाई

Ahmednagar | Sangamner: मुकुंद देशमुख : २५ जणांवर प्रतिबंधक कारवाई (Deportation), आगामी काळात विविध सण, उत्सव.

Deportation action against 30 people from Sangamner

संगमनेर: पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ३० जणांवर सीआरपीसी १४४ अन्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना ठरावीक कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे. अगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.

आगामी काळात विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार तसेच सार्वजनिक सण, उत्सवादरम्यान गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये ही कारवाई करणात आली आहे. त्यात ३० जणांवर ठरावीक कालावधीकरिता हद्दपारीची, तर २५ जणांवर वेगवेगळ्या कलमांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सण, उत्सव शांततेत पार पाडावे, त्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात आली.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शांतता समितीतील सदस्य यांच्याशी चर्चा करून आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लवकरच शांतता समितीची बैठक होणार आहे. असेही पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Deportation action against 30 people from Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here