Home महाराष्ट्र 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार! या नावावर शिक्कामोर्तब

31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार! या नावावर शिक्कामोर्तब

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 | Devendra Fadnavis Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis Maharashtra New CM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे,  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर सर्व प्रक्रिया पार पडून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा खरी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

21 जून 2022 साली एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. पुढे अजित पवार देखील शिंदे-फडणवीस यांच्या सोबत सरकारमध्ये स्थापन केले. 2024 सालच्या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने एकत्रित लढल्या. यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्यातच कालच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा खरी ठरणार आहे. शपथविधी ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तविल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.

Web Title: Devendra Fadnavis Maharashtra New CM

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here