संगमनेर: धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पसार
Breaking News | Sangamner: कामगार तलाठी म्हणून कार्यरत असणार्या दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनीगंठण मेंढवणला जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून धूम ठोकल्याची घटना.
संगमनेर; धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून पोबारा करणार्या घटनांचा सिलसिला सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. चंदनापुरी येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असणार्या दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनीगंठण मेंढवणला जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून धूम ठोकल्याची घटना मंगळवारी (दि. 18 जून) सव्वाचार वाजेच्या सुमारास समनापूर शिवारात घडली आहे. सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
भारती अशोक भुरके (वय 50) या तालुक्यातील चंदनापुरी येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्या सव्वाचार वाजेच्या सुमारास सहकारी मैत्रिणींसोबत मेंढवण येथे जात होत्या. त्याचवेळी समनापूर शिवारात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण ओरबाडले. यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. तेव्हा जवळील नागरिक गोळा झाले. परंतु, चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेले. याप्रकरणी भारती भुरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तर महिलांनी दागिने घालावे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Web Title: Dhoomstyle scratched the jewelry from the woman’s neck
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study