Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विहिरीत पडून एका जणाचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात विहिरीत पडून एका जणाचा मृत्यू

died after falling into a well in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळसणे येथील एका जणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बबन अण्णा शिंदे वय ६० असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बबन शिंदे हे डोळसणे येथे राहत होते. शनिवारी ते अंघोळ करण्यसाठी विहिरीवर गेले असता बदलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरून तोल जात ते विहिरीत पडले होते.

सोमवारी काही महिला या विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेल्या असता त्यावेळी त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह पाण्यातून वरती काढण्यात आला.

याप्रकरणी उमेश शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहे.

Web Title: died after falling into a well in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here