Home अहमदनगर दुर्देवी!  संगमनेर येथे भावबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन जात असताना अपघातात भावा-बहिणीची कायमची...

दुर्देवी!  संगमनेर येथे भावबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन जात असताना अपघातात भावा-बहिणीची कायमची ताटातूट

Breaking News | Ahilyanagar Accident: एकेरी वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू.

died in an accident while taking his sister's saree for Bhavji at Sangamner

राहुरी:  भाऊबीजेसाठी बहिणीकडे साडी घेऊन निघालेल्या भावावर काळाने घातला आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

एकेरी वाहतुकीमुळे या तरुणाचा ऐन सणासुदीला दुदैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना काल (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील कान्होबाची वाडी येथील २७ वर्षीय तरुण दत्ता पांडुरंग मोरे हा १ नोव्हेंबरच्या रात्री एम.एच.१७- सी- यु-३७६४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून संगमनेर येथे भावबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन जात असताना नगर-मनमाड मार्गावर चिंचोली फाटा येथील एकेरी वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी माजी सरपंच गणेश हारदे, अशोक टकले, योगेश वाघ, योगीराज कुलकर्णी आदिंसह नागरिकांनी मदतकार्य केले.रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाये यांनी पंचनामा केला.

Web Title: died in an accident while taking his sister’s saree for Bhavji at Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here