शेतकऱ्याकडून दोन लाखाची लाच घेताना मंडलाधिकारी अटकेत
राहता | Rahata: येथील मंडलाधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याकडून दोन लाखाची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडण्यात पथकास यश आले आहे.
राहता येथील तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीचा सातबारा उताऱ्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी भालेकर यांनी तब्बल तीन लाखांची मागणी केली होती. यामधील तात्काळ दोन लाख व उर्वरित रक्कम आठ दिवसांनी देण्यात यावे अशी मागणी केली होती. याबाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मंगळवारी पथकाने राहता येथे सापळा रचून भालेकर याला दोन लाखांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नाशिक पथकातील पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्यासह पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे या पथकाने कारवाई केली आहे.
Web Title: District Magistrate arrested while accepting bribe