Home Maharashtra News धक्कादायक! डॉक्टरचे सैतानी कृत्य: अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

धक्कादायक! डॉक्टरचे सैतानी कृत्य: अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

Doctor's satanic act Rape of a minor girl

नांदेड | Nanded Crime : नांदेडच्या  किनवट गावात डॉक्टरचे सैतानी कृत्य उघडकीस आले आहे.  एका १४ वर्षाच्या मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेऊन डॉक्टरने सातत्याने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीतेचा गर्भपात झाल्याने ही घटना काल उघडकीस आली आहे. या घटनेने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

डॉक्टर विकास सुंकरवार असे डॉक्टरचं नाव आहे.

अल्पवयीन असलेली पिडीत मुलगी ही वर्षेभरापासून किनवट येथील डॉ. विकास सुंकरवार यांच्याकडे साफ सफाईचे काम करत होती. असाह्यतेचा आणि वेगवेगळे अमिष दाखवून डॉक्टरने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार (sexual assault) आहे. यातून ती ४ महिन्याची गर्भवती राहिली. पोट दुखत असल्याने तिला दवाखान्यात दाखल केले असता बाथरुम मध्येच तिचा गर्भपात झाल्याने बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

पिडीतेचा इन कॅमेरा जबाब नोंदवून डॉ. सुंकरवार विरोधात किनवट पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. सुंकरवार याला न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Doctor’s satanic act Rape of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here