Home अहमदनगर अहमदनगर: उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे धक्कादायक कृत्य

अहमदनगर: उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे धक्कादायक कृत्य

Breaking News | Ahmednagar Crime: पाठीचा त्रास होत असल्याने निसर्ग उपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत तेथील डॉक्टरने गैरवर्तन केल्याची घटना. विनयभंगाचा (Molested) गुन्हा दाखल.

doctor's shocking act with a woman who came for treatment, Molested Woman

अहमदनगर: पाठीचा त्रास होत असल्याने निसर्ग उपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत तेथील डॉक्टरने गैरवर्तन केल्याची घटना जुने कोर्ट, समर्थ शाळेजवळ, सांगळे गल्लीतील आयुर्वेदामृत निसर्ग उपचार केंद्रात सोमवारी (दि. १८) दुपारी दीडच्या सुमारास घडली. पीडित महिलेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष साळवे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जुने कोर्ट, समर्थ शाळेजवळ, सांगळे गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. फिर्यादी महिलेला पाठीचा त्रास होत असल्याने त्या उपचार घेण्यासाठी सोमवारी दुपारी सांगळे गल्लीतील साळवे याच्या आयुर्वेदामृत निसर्ग उपचार केंद्रात गेल्या होत्या. तेथे साळवे याने त्यांना तुम्हाला चेक करावे लागेल असे म्हणून एका रूममध्ये झोपण्यास सांगितले. तेथे त्याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझा बेत पाहतो असे म्हणून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस अंमलदार निता अडसरे अधिक तपास करत आहेत.

Web Title: doctor’s shocking act with a woman who came for treatment, Molested Woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here