संगमनेर शहरात खेळणाऱ्या लहान मुलांवर कुत्र्यांचा हल्ला
Breaking News | Sangamner: गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच सहा लहान बालके जखमी झाली असून मोकाट कुत्र्यांची संगमनेरमध्ये शहरात दहशत पसरली.
संगमनेर: मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच सहा लहान बालके जखमी झाली असून मोकाट कुत्र्यांची संगमनेरमध्ये शहरात दहशत पसरली आहे. नगरपालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
संगमनेर शहरातील नाशिक-पुणे मार्गालगत असलेल्या मोगलपुरा (राजवाडा) येथे शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मोकाट कुत्र्यांच्या या हल्ल्यात रात्री घराबाहेर खेळणारी पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच-सहा लहान मुलं जखमी झाले आहेत. अब्दुल कवी तबरेज, ईनाया हिम्मत कुरेशी, मारिया सलीम शेख अशी तीन जखमी मुलांची नावे समोर आली असून अन्य जखमी मुलांचे नावे समजू शकले नाही.
या प्रकाराने मोकाट कुत्र्यांची शहरात दहशत निर्माण झाल्याचे दिसते. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना उपद्रव निर्माण करणारी कुत्र्यांची मोकाट फिरणारी टोळी आता लहान बालकांना आपले लक्ष्य बनवत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Web Title: Dogs attack children playing in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study