भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात एका वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून या दाम्पत्याची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण भिवंडीत एकच खळबळ माजली आहे. बाळू पाटील आणि सत्यभामा पाटील अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी आणि अकलोली दरम्यान असलेल्या पेंढरीपाडा या गावात राहणाऱ्या वयस्कर पती-पत्नीची राहत्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळू पाटील व त्यांच्या पत्नी सत्यभामा यांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्येचा पंचनामा करीत पोलिसांनी या खुनाचा पुढील तपास सुरू केला आहे. ही हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली याचा शोध आता पोलीस लावत आहेत.
Web Title : Double murder in Bhiwandi: Murder of elderly husband and wife