Home Maharashtra News राज्‍य परिवहन महामंडळातील चालकाने केले विष प्राशन, प्रकृती चिंताजनक

राज्‍य परिवहन महामंडळातील चालकाने केले विष प्राशन, प्रकृती चिंताजनक

Driver trying suicide by State Transport Corporation driver

धुळे: राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारींचा साडे महिन्यापासून सुरू असलेला संप अजून देखील सुरु आहे. यामधील धुळे आगारातील चालक पदावर कार्यरत असलेल्या रविंद्र रघुनाथ पवार या एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

बस चालकास कुटुंबियांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, विष प्राशन केलेल्या आंदोलक एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या चार महिन्यापासून वेतन बंद असल्याने आर्थिक विबंचानेतूनतसेच  घरखर्च भागवता येत नसल्याचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्‍याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रशासनातर्फे दखल घेण्याची कुटुंबीयांची मागणी केली आहे.

राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या साडेतीन महिन्‍यांहून अधिक दिवसांपासून संपावर आहेत. महामंडळाचे विलणीकरणाच्‍या मागणीसाठी संप पुकारलेला आहेमात्र राज्‍य शासनाला ही मागणी मान्‍य नसल्‍याने अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. उलट संप अधिक चिघळत असल्‍याचे दिसून येत आहे.

Web Title: Driver trying suicide by State Transport Corporation driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here