टोल वसुली भरुन अंमली पदार्थ संगमनेरात येतायेत- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप
Breaking News | Sangamner Balasaheb Thorat: संगमनेर शहरामध्ये गुंडागिरी, काळे धंदे वाढले आहेत. अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे, असा आरोप त्यांनी केला.

संगमनेर: आपण राज्यघटना आणि संतपरंपरेचा, मानवतेचा विचार जपणारे आहोत. पक्ष बदलून उड्या मारल्या असत्या तर आपणही मंत्री झालो असतो, परंतु आपण असे कधी केले नाही. चाळीस वर्षे तालुका जपला. शांतता-सुव्यवस्था राखत विकास केला. मात्र मागील एक वर्षामध्ये शहरामध्ये गुंडगिरी, दादागिरी वाढली आहे. टोल वसुली भरून अंमली पदार्थ संगमनेरमध्ये येत आहेत हे सगळे थांबवण्यासाठी सर्वांनी संगमनेर सेवा समितीच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोर्वे नाका, चैतन्यनगर, बागवानपुरा येथे झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, उत्कर्षा रुपवते, अजीज ओहरा, विश्वास मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, लाला पठाण, इसाहकखान पठाण यांसह सेवा समितीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, ही निवडणूक शहर आणि तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. भाजप सत्तेसाठी काहीही करते, धर्माचा आणि पैशांचा वापर याचबरोबर विविध फंडे वापरले जातात.
महाराष्ट्राने बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिले आहे. आपल्या सर्वांना संगमनेरचा किल्ला अधिक मजबूत करायचा आहे. मी ४० वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेतले अगदी विरोधकांनाही बरोबर घेतले. मात्र मागील एक वर्षापासून
गुंडगिरी खपवून घेणार नाही- आ. तांबे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे एक परिवाराप्रमाणे आहे. येथे सर्व समाजाचे लोक आनंदाने राहतात ही परंपरा आपल्याला जपायची आहे. तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून गुंडगिरी व दडपशाही करणारी प्रवृत्ती संगमनेरमध्ये खपवून घेणार नाही असा इशारा देत शहराचा परिपूर्ण आराखडा राबवणार असून विकासकामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी असल्याचे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले. चैतन्यनगर, मालदाड रोड, मेन रोड, घोडेकर मळा येथे झालेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. संगमनेर शहराची विकासातून मोठी वाटचाल झाली आहे. मोठमोठ्या विकासाच्या योजना मार्गी लागल्या आहेत. मात्र मागील चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असून प्रशासकही सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करत आहे. विकासकामे रखडली आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Breaking News: Drugs are being brought into Sangamner Balasaheb Thorat

















































