अहमदनगर: दारूच्या नशेत पत्नीला केले ठार, आरोपी जेरबंद
Ahmednagar News: घरगुती भांडणाच्या कारणावरुन पत्नीला मारहाण करुन ठार केले. कोतवाली पोलीसांची कारवाई आरोपीला अटक.
अहमदनगर : घरगुती भांडणाच्या कारणावरुन पत्नीला मारहाण करुन जीवे ठार मारणाऱ्या आरोपी पतीला कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर सुरेश चौधरी (राहणार, इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन, अहमदनगर ) असे आरोपीचे नाव आहे. मयत महिलेच्या नातेवाईक ऊषा निलेश राठोड (वय ४५ वर्षे धंदा- मजुरी रा. वॉर्ड नं २, सुरादवी, आंबराई झोपडपट्टी, ता. कामठी, जि. नागपुर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर सुरेश चौधरी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिवानी राजकुमार तिवारी (वय २५) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी ज्ञानेश्वर चौधरी याचे पत्नीसोबत २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वा. चे सुमारास वाद झाले. आरोपीने घरगुती कारणावरुन दारूचे नशेत पत्नीला कशानेतरी जबर मारहाण केली. पत्नीला अधिक मार लागल्याने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे भरती केले होते.
शिवानी चौधरी यांच्यावर उपचार सुरु असताना अधिक रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. मयत शिवानी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस् अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्य मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पो.ह. तन्वीर शेख गणेश धोत्रे पो.ना. योगेश भिंगारदिवे याकूब सय्यद्, रियाझ इनामदार, सुजय हिवाळे, संदीप थोरात, सोमनाथ राऊत अमोल गाढे कैलास शिरसाट मच्छिद्र पांढरकर यांनी ही कारवाई केली.
Web Title: Drunk wife killed, accused jailed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App