Home क्राईम ‘दूधगंगा’ पतसंस्था अपहार: सहा दिवसांची पोलीस कोठडी, ठेवीदारांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

‘दूधगंगा’ पतसंस्था अपहार: सहा दिवसांची पोलीस कोठडी, ठेवीदारांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

Sangamner Crime: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा अपहार, चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने सहा दिवसांची (24 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.

Dudhganga' Patsanstha embezzlement six days in police custody

संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. १९) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात संस्थेशी संबंधित २१ विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत हा अपहार झाला आहे.

भाऊसाहेब दामोदर कुटे (रा. गणपती मळा, सुकेवाडी, संगमनेर), भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा. संगमनेर), भाऊसाहेब संतू गायकवाड (रा. घुलेवाडी, संगमनेर), चेतन नागराजबाबा कपाटे (रा. पैठण रस्ता, संभाजीनगर), दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे (सर्व रा. गणपती मळा, सुकेवाडी, संगमनेर), कृष्णराव श्रीपतराव कदम, प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम (सर्व रा. देवळाली प्रवरा, राहुरी), संदीप दगडू जरे (रा. भुतकरवाडी, सावेडी, निकम (जिल्हा विशेष लेखापरीक्षक अहमदनगर), लहानू गणपत कुटे (रा. वर्ग एक, सहकारी संस्था, अहमदनगर) सुकेवाडी, संगमनेर), उत्तम शंकर लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा (रा. वडगाव लांडगा, संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात (रा. सुकेवाडी, संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, घुलेवाडी, संगमनेर), अरुण के. बुरड (रा. सी २०१, नयनतारा, सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. ४८०, अरिहंत हॉस्पिटलजवळ, आकाशवाणी केंद्र रस्ता, गंगापूर, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, सन 2016 ते 2021 पर्यंत संस्थेत कार्यरत असलेले चार लेखापरीक्षक, दोन वैधानिक लेखापरीक्षक अशा तब्बल 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 408, 409, 465, 467, 471, 477-A नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या तीन पथकांनी रात्रीतून संगमनेरमधून लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांना तर अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षकाला नाशिकमधून अटक केली. चार जण अटकेत तर इतर पसार झाले आहेत.

संगमनेर मधील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापक, चीफ अकाउंटंटसह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली. अटक केलेल्या चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने सहा दिवसांची (24 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

बँकेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह अन्य आरोपी पसार झाले असून पोलीस पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान सकाळपासून पोलिसांच्या चार पथकांनी अध्यक्ष कुटे आणि व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्या घरी छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. आक्षपार्ह आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी भगवान मथुरे यांनी दिली.

दरम्यान याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी ठेवीदारांना या संदर्भात आवाहन केले असून संस्थेच्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींची माहिती कागदपत्रासह पोलिसांना द्यावी. या माहितीचा उपयोग आरोपी विरोधात पुरावा म्हणून केला जाणार आहे. यामुळे नेमक्या किती ठेवेदारांच्या ठेवी संस्थेत अडकल्या याचीही माहिती समोर येणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Dudhganga’ Patsanstha embezzlement six days in police custody

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here