Home संगमनेर दूधगंगा पतसंस्था अपहार; मुख्य आरोपी अद्याप पसारच, ठेवीदारांमध्ये असंतोष

दूधगंगा पतसंस्था अपहार; मुख्य आरोपी अद्याप पसारच, ठेवीदारांमध्ये असंतोष

Sangamner News | Dudhganga Patsanstha embezzlement: आर्थिक प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने वाढ केली.

Dudhganga Patsanstha embezzlement The main accused is still at large

संगमनेर: येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील 80 कोटी 79 लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे अद्यापही पसारच आहे. दरम्यान या आर्थिक प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने वाढ केली असून या आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 81 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे फेर लेखा परीक्षणात उघडकीस आले होते. यानंतर जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील लहानू गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल प्रकाश क्षीरसागर, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.

या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत काल संपल्याने त्यांना अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर हजर केले होते. सरकारी वकिलांच्या मागणीनुसार या गुन्ह्यात पोलिसांनी नव्याने वाढीव महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999) चे कलम 3 लावले आहे. यामुळे आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. 

दरम्यान या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे अद्याप पसार आहे. मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष याला अटक का केले जात नाही असा सवाल आता सभासद व ठेवीदारांमधील विचारला जाऊ लागला आहे. पोलीस तपासाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.  ठेवीदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार हा मोठा असल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी सुरू झाली आहे.

Web Title: Dudhganga Patsanstha embezzlement The main accused is still at large

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here