संगमनेरमध्ये ईडीचा छापा, १०० कोटी वसुलीची चौकशी
संगमनेर | Sangamner: मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे १०० कोटी वसुलीचे चौकशी सुरु आहे. या पत्रात एसीपी संजय पाटील व उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख आहे.
भुजबळ यांच्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील घरावर ईडीच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. घरावर छापा टाकून त्यांनी नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली.
पत्रात उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख आहे. भुजबळ यांचे मुळगाव संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावाचे आहे. त्यामुळे ईडीच्या पथकाने तीन तास कसून चौकशी केली.
पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या काही अनेक वर्षापासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र त्यांची शेती व नातेवाईक गावी राहतात. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाईक यांची माहिती मिळाल्याने पथकाने तेथे जाऊन चौकशी केली. भुजबळ यांचे नातेवाईक यांचे पथकाने जबाब नोंदविले.
Web Title: ED raid at Sangamner